दान - एका प्रगल्भ दृष्टिकोनातून . . . .
भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्व आहे. दान कुणाला करावे, केव्हा करावे तसेच कोणत्या प्रकारचे दान असावे या विषयी वेद, उपनिषद, पुराण आणि संत साहित्यात व्यापक माहिती आढळते. नारद पुराण म्हणते, जसे सोने अग्नीने शुद्ध होते, शरीर पाण्याने शुद्ध होते, तपश्चर्येने आत्मा शुद्ध होतो आणि दानाने धन शुद्ध होते. सत्पात्री व्यक्तीस अथवा संस्थेस श्रद्धेने केलेले दान कधीही वाया जात नाही. हे निश्चितपणे अनंत आणि अक्षय फळ देते. दान देण्याविषयी असं म्हंटल जातं की "शंभर हातांनी धन कमवावं आणि हजार हातांनी दान द्यावं" या लेखामध्ये "दान" या विषयावर मी ऐकलेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि व्यापक तथा अत्यंत प्रभावी अशी माहिती सादर करणार आहे. हि माहिती "आर्ट ऑफ लिविंग" या संस्थेच्या "सहज समाधी ध्यान योग" या कार्यशाळेत मी "गुरुदेव श्री श्री रविशंकर" यांचे अनुयायी "श्री. रत्नेश्वर शेटे" यांच्याकरवी ऐकली होती. हि माहिती पुढीलप्रमाणे.... प्रसादाची संकल्पना सर्वांना ठाऊक आहेच, कोणत्याही जेवणाला किंवा जिन्नसाला आपण प्रसाद नाही म्हणत. विशिष्ट प्रसंगी ज...