दान - एका प्रगल्भ दृष्टिकोनातून . . . .

 


भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्व आहे. दान कुणाला करावे, केव्हा करावे तसेच कोणत्या प्रकारचे दान असावे या विषयी वेद, उपनिषद, पुराण आणि संत साहित्यात व्यापक माहिती आढळते. नारद पुराण म्हणते, जसे सोने अग्नीने शुद्ध होते, शरीर पाण्याने शुद्ध होते, तपश्चर्येने आत्मा शुद्ध होतो आणि दानाने धन शुद्ध होते. सत्पात्री व्यक्तीस अथवा संस्थेस श्रद्धेने केलेले दान कधीही वाया जात नाही. हे निश्चितपणे अनंत आणि अक्षय फळ देते. दान देण्याविषयी असं म्हंटल जातं की "शंभर हातांनी धन कमवावं आणि हजार हातांनी दान द्यावं"

या लेखामध्ये "दान" या विषयावर मी ऐकलेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि व्यापक तथा अत्यंत प्रभावी अशी माहिती सादर करणार आहे. हि माहिती "आर्ट ऑफ लिविंग" या संस्थेच्या "सहज समाधी ध्यान योग" या कार्यशाळेत मी "गुरुदेव श्री श्री रविशंकर" यांचे अनुयायी "श्री. रत्नेश्वर शेटे" यांच्याकरवी ऐकली होती. हि माहिती पुढीलप्रमाणे.... 

प्रसादाची संकल्पना सर्वांना ठाऊक आहेच, कोणत्याही जेवणाला किंवा जिन्नसाला आपण प्रसाद नाही म्हणत. विशिष्ट प्रसंगी जेव्हा देवासमोर ताट (नैवद्य) ठेवलं जातं आणि त्यानंतर जे शिल्लक राहते किंवा ते इतरांमध्ये वाटले जाते त्याला आपण प्रसाद म्हणतो किंवा अगदीच थोडक्यात सांगायचे झाल्यास "देवाला नैवद्य दाखवून झाल्यानंतर त्या अन्नाचे रूपांतर हे प्रसादात होते" असं म्हणायला हरकत नाही, आणि ह्या प्रसादाची गोडी, चव, माधुर्य काही औरच !!! अगदी ह्याच नियमाप्रमाणे आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे जे काही मासिक उत्पन्न असेल त्यातील ३ टक्के रक्कम हि दान करून (अर्थात सत्पात्री दान असावे) जे शिल्लक राहील तो "प्रसाद".....आणि मंग हा प्रसाद हा सत्कार्यासाठीच कामी येतो (असा मी तरी अनुभव घेतलाय). प्रत्येकवेळी विनाकारण काही आर्थिक तूट सहन करावी लागत असेल तर कालांतराने ती देखील थांबते शिवाय घरातील कोण्या व्यक्तीचा आजारपण-औषध यासाठीचा खर्चही आटोक्यात येतो. अर्थात हि प्रसादाची भावना अगदी घट्ट हवी. "भावे तैसा पावे" हि उक्ती सर्वांना ठाऊक आहेच. खरं पाहत मासिक मिळकतीच्या १०% दान करावं असं शास्त्राने सांगितले आहे आणि शास्त्र सांगते त्याला सर्वोतोपरी भौतिक, सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा असतोच. ह्यात गुरूंच्या मुखी जे ३% दान हे अश्या अनुषंगाने आलं असावं कि अर्थात जे काहीच देणं (दान) देत नाहीत अश्यांसाठी त्यांचं हे सांगणं असावं, जेणेकरून त्यांनी देखील काही अंशी अध्यात्मिक उन्नति साधावी.


 

Comments

Popular posts from this blog

"Sahaj-Samadhi-Dhyana" Experience - In Vedantin Way......